दिनांक: रविवार, ६ जुलै २०२५
स्थळ: पुणे, महाराष्ट्र
आजच्या स्वच्छ आणि सकारात्मक रविवारी पुणे येथील सौ. सुप्रियाताई व श्री. शामकांत धर्माधिकारी या दाम्पत्यांनी एक स्तुत्य उपक्रम करत, सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मिनाक्षी जोशी वृद्धाश्रम याकरिता ₹५१,०००/- चा धनादेश (चेक) सुपूर्त केला. हा केवळ आर्थिक मदतीचा हात नव्हे तर एक प्रेमळ आशीर्वादच म्हणता येईल.
या उदात्त कार्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेली सुविधा, आरोग्य सेवा आणि सामाजिक आधार अधिक बळकट होणार आहे. धर्माधिकारी कुटुंबियांचे हे योगदान समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

या कार्यक्रमात सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांच्या प्रति मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते:
- मिनल अहिरे मॅडम, अध्यक्षा, सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट
- श्री. विश्वकांत लोकरे साहेब, सचिव, ट्रस्ट
- माधुरी सेवलकर मॅडम, मुख्य मार्गदर्शिका
- श्री. माणिक पंडित, मुख्य सल्लागार
सर्व मान्यवरांनी धर्माधिकारी दाम्पत्याच्या या सामाजिक कार्याचे मन:पूर्वक कौतुक करत, इतर नागरिकांनाही अशा सेवाभाव प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट बद्दल:
सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गरजू व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा आणि कल्याणासाठी कार्यरत आहे. मिनाक्षी जोशी वृद्धाश्रम या माध्यमातून संस्था वृद्धांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी अनेक उपक्रम राबवत असते.